Advertisement

Coronavirus Update: मुंबईत १७५६ कोरोना रुग्ण

मागील काही दिवसांपासून कोरोनानं मुंबईला टार्गेट केलं आहे.

Coronavirus Update: मुंबईत १७५६ कोरोना रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येनं आता २००० चा आकडा पार केला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनानं मुंबईला टार्गेट केलं असून, मुंबईतील रुग्णांची संख्या १७५६ वर गेली आहे. 

मुंबईत मंगळवारी २०४ नवे रुग्ण आढळले असून, शहर व उपनगरात मंगळवारी ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं मृतांचा आकडाही ११२ वर पोहोचला आहे. शहरातील वाढते संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.

मुंबईत ५ ते १३ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशियत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ९० क्लिनिक्समध्ये ३५१८ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी १३८४ संशियतांचे नमुने घेण्यात आले.

मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी ७८१ कोरोना रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षण अंतर्गत कोविड संशियत रुग्णांचा शोध या अंतर्गत सापडले आहेत. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात सोमवारी ३ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा