Advertisement

भाज्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी पालिकेची अनोखी शक्क्ल

अंधेरी, पार्ले, जोगेश्वरीतील रहिवाशांना घरीच राहता येणार आहे.

भाज्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी पालिकेची अनोखी शक्क्ल
SHARES

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असताना अनेक जण भाजी आणि किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या के  पश्चिम विभागानं चांगलाच उपाय शोधला आहे. त्यामुळं आता या विभागातील अंधेरी, पार्ले, जोगेश्वरीतील रहिवाशांना घरीच राहता येणार आहे.

कोणतीही भाजी न वापरता धान्य, विविध पिठं, डाळी, दूध, दही आदी पदार्थ वापरून बनविता येणाऱ्या आलू पराठा, डोसा, कढी-भात, झुणका भाकरी, शिरा अशा तब्बल ६३ पदार्थाची यादी पालिकेच्या के पश्चिम विभागानं जाहीर केली आहे. अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी हा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सर्वाधिक रुग्ण संख्येच्या विभागात मोजला जातो आहे. वर्सोवा, डी. एन. नगर असा अंधेरी पश्चिमचा भाग, पार्ले पश्चिम आणि गुंदवली, वेरावली व जोगेश्वरीचा पश्चिम भाग असलेला पालिकेचा के पश्चिम विभागात येतो. 

या विभागात ८० करोनाबाधित रुग्ण असूनही अनेक जण भाज्या आणायला बाजारात जात आहेत. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी या विभागातील सर्व भाजी बाजार, फळ बाजार ७ एप्रिलपासून बंद करण्यात आला आहे. तर किराणा मालाची दुकानं सोमवारी ९ ते ५ या वेळात सुरू राहणार आहेत. त्यामुळं ही काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयानं पदार्थांची यादी जाहीर केली आहे.

धान्य, विविध पिठे, डाळी, दूध, दही यापासून बनवता येतील अशा ६३ पदार्थांची ही यादी या परिसरातील लोकांना देण्यात आली आहे. त्यात झुणका भाकरी, मिसळ पाव, डोसा, इडली, पराठा, गाठिया भाजी, दाल मखनी अशा विविध प्रांतातील पदार्थांचा यात समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा