मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 16 टक्क्यांनी वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मे 2026 अखेर मध्य रेल्वेने (central railway) 20.48 कोटी रुपयांचा भाडे व्यतिरिक्त महसूल (revenue) मिळवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या 17.54 कोटी रुपयांच्या तुलनेत 16.78 टक्क्यांची वाढ (rise) नोंदवली आहे.

मे 2026 या महिन्यात ई-लिलाव प्रक्रियेद्वारे 29 कंत्राटे मंजूर करण्यात आली आहे. त्यांचे एकूण वार्षिक परवाना शुल्क 409.72 लाख रुपये आहे.

रेल्वेच्या उपलब्ध मालमत्तेचा व्यावसायिक वापर करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याच्या धोरणाला यामुळे बळ मिळाले आहे.

जाहिरातीसाठी मुंबई (mumbai) विभागाने अनेक महत्त्वाची कंत्राटे दिली आहेत. गाडी क्रमांक 22177 महानगरी एक्स्प्रेससाठी पूर्ण बाह्य ‘विनाइल रॅपिंग’ आणि अंतर्गत जाहिरातींसाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 13.22 लाख रुपये कंत्राट देण्यात आले आहे.

याशिवाय डेक्कन एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेससाठी वार्षिक 12.50 लाख रुपये, तर सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेससाठी वार्षिक 6.55 लाख रुपये किमतीची जाहिरात कंत्राटे देण्यात आली आहेत.

रेल्वे डिस्प्ले नेटवर्क अंतर्गत तारघर स्थानकावर ग्लो साइन बोर्डसाठी वार्षिक 6 लाख रुपये, तर धामणगाव येथे साइन बोर्डसाठी वार्षिक 1.36 लाख रुपये उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई विभागाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल कोच रेस्टॉरंटसाठी वार्षिक 48.09 लाख रुपये किमतीचे कंत्राट दिले आहे.

याशिवाय मुलुंड गुड्स डेपो, कळंबोली, वाशिंद, ट्रॉम्बे (माहुल) आणि ठाणे (thane) येथे वेटिंग रूम, कॅन्टीन, किराणा दुकान तसेच बॅटरी स्वॅपिंग स्टेशन यांसारख्या सुविधांसाठीही विविध कंत्राटे देण्यात आली आहेत.

सीएसएमटी (csmt)-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार डब्यांतील हेडरेस्टवर जाहिरातींसाठी तीन वर्षांच्या कालावधीचे वार्षिक 16.83 लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.

तसेच बाह्य परिसरातील जाहिरातींतर्गत मुंबई विभागाने नवी मुंबई (navi mumbai) विमानतळ मार्गावरील तीन नवीन होर्डिंग्जसाठी वार्षिक 1.32 कोटी रुपये तसेच मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील होर्डिंगसाठी वार्षिक 17.10 लाख रुपये किमतीची कंत्राटे दिली आहेत.


हेही वाचा

अदानींचा 20 हजार कोटींचा मेगा प्लॅन

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीत मोठा बदल

पुढील बातमी
इतर बातम्या