मध्य रेल्वेचा कल्याण ते लोणावळा दरम्यान ब्लॉक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेच्या (central railway) लोणावळा-बीव्हीटी यार्ड तसेच कल्याण (kalyan) -लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लाॅक (special block) घेण्यात येणार आहे.

या कामामुळे मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ब्लाॅक कालावधीत लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील यार्ड पुनर्रचना व इतर पायाभूत कामे हाती घेण्यात येणार आहेत.

26 आणि 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.25 ते सायंकाळी 6.25 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या ब्लाॅकमुळे जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस कर्जत येथे 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा (lonavala) येथे एक तास, एलटीटी-मदुराई एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे 10 मिनिटे, सीएसएमटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस लोणावळा येथे 10 ते 15 मिनिटे थांबवण्यात येणार आहे.

तसेच 27 नोव्हेंबर रोजी एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस भिवपुरी रोड येथे 10 मिनिटे थांबवण्यात येईल. 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी सीएसएमटीवरून सुटणारी सीएसएमटी-होस्पेट एक्स्प्रेस उशिरा सुटेल.

त्याचप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी मदुराई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस एलटीटी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचेल.

शीळफाटा येथील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवली दरम्यान चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथे असलेला उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी हा ब्लाॅक घेतला आहे.

हा ब्लाॅक 25 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 2 आणि 7 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री 1.10 ते 04.10 वाजेपर्यंत असेल. ब्लाॅकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

कालावधीत मंगळुरू ते सीएसएमटी (csmt) अतिजलद एक्स्प्रेस कळंबोली येथे 50 मिनिटे थांबविण्यात येईल.

30 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर रोजी दौंड ते ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल. या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात येणार आहे.


हेही वाचा

पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण

वरळी: शंकरराव नारम पाथ 'या' तारखेपर्यंत तात्पुरता वन-वे जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या