
मुंबई (mumbai) शहरी वाहतूक प्रकल्पाअंतर्गत (MUTP -3) पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू झाले आहे.
आजवर या प्रकल्पाचे 80 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. तसेच उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) महत्त्वाचा ठरणार आहे.
मध्य रेल्वेवरील (central railway) उपनगरीय नेटवर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने एमयूटीपी 3 अंतर्गत पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. 2,782 कोटी खर्चून मंजूर राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची भौतिक प्रगती 80 टक्क्यांहून अधिक झाली आहे.
हा कॉरिडॉर पनवेल (panvel) आणि कर्जत (karjat) दरम्यान एक समर्पित दुहेरी-मार्ग उपनगरीय मार्ग प्रदान करेल. त्यामुळे नवी मुंबई, रायगड जिल्हा आणि जवळच्या विकास केंद्रांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होईल.
त्याचप्रमाणे विद्यमान उपनगरीय नेटवर्कवरील ताण कमी होऊन हजारो दैनंदिन प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होणार आहे.
या प्रकल्पासाठी खासगी, सरकारी आणि वनजमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. तर पूल आणि बोगदे यांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.
या मार्गावरील तीन बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. अंतिम अस्तरीकरण पूर्णत्वाच्या जवळ आले आहे.
पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत (karjat) येथील स्टेशन इमारती आणि प्रवासी सुविधा पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत.
तसेच बुकिंग ऑफिस, सर्क्युलेशन एरिया, स्टाफ क्वार्टर, फूट ओव्हरब्रिज आणि उपनगरीय इमारती यासारख्या अनेक सुविधा आधीच कार्यान्वित झाल्या आहेत.
बॅलास्ट फॉर्मेशन आणि रेल्वे पॅनेल अनलोडिंगद्वारे अनेक विभागांमध्ये ट्रॅक लिंकिंगचे काम प्रगतीपथावर आहे.
चालू कामात यार्ड रीमॉडेलिंग, प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट आणि सीओपी फाऊंडेशनचा समावेश आहे, तर मोहोपे आणि चौक येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
हेही वाचा
