केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही आठवड्यांपासून घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्यामुळे आता केंद्र सरकारनं नव्या अनलॉक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

केंद्राकडून या नव्या मार्गदर्शक सूचना एका पत्राद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश जारी करून, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी या पत्रात राज्यांना आज जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

काय आहेत केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?

  • सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव यासह विविध समारंभावरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.
  • शाळा, महाविद्यालये तसंच विविध कोचिंग क्लासेस अशा शैक्षणिक आस्थापना कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू करता येतील.
  • रेस्टोरेंट, थिएटर आणि व्यायाम शाळा इत्यादी आस्थापना सुरू करता येऊ शकतात.
  • लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले जाणार आहेत.
  • सार्वजनिक वाहतूकींवरील निर्बंध तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासासाठीचे निर्बंधही काढण्यात येणार आहेत.
  • सरकारी तसंच खाजगी कार्यालये कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरू करता येतील.
  • वरील सर्व तरतूदी या त्या-त्या ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना या पत्रामध्ये करण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबईतील 'ही' ४ कोरोना जम्बो रुग्णालये होणार बंद

सार्वजनिक स्थळांवरील कोरोना चाचण्या पालिकेनं थांबवल्या

पुढील बातमी
इतर बातम्या