1 जूनपासून या बेस्ट बस मार्गांमध्ये बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बेस्ट उपक्रमाने 9 मे पासून तिकीट दरात वाढ केल्यानंतर, आता 1 जूनपासून बेस्ट बसमार्गांत बदल (route change) करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीनंतर बेस्टच्या (best) प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटली आहे.

बेस्ट मार्गांत बदल करताना त्यात काही नवीन मार्ग सुरू केले जातील. तसेच, 30 बस मार्गांमध्ये बदल होणार असून काही बसमार्ग खंडीत केली आहे.

बेस्ट बसमार्गांतील नवीन बदलानुसार मंत्रालय ते दादलानी पार्क, ठाणेपर्यंत आणि प्रतीक्षा नगर ते पोर्तुगीज चर्चपर्यंत नवीन बससेवा सुरू होणार आहे. मंत्रालय ते बाळकुम दादलानी पार्क ही बस पूर्व मुक्त मार्गाने ए 490 क्रमांकाने धावणार आहे.

ए 175 ही नवीन बस प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा चर्च, दादर, प्लाझा, शिवाजी पार्क, पोतुगीज चर्च, कबुतर खाना, प्लाझा मार्गे वर्तुळाकार धावणार आहे. बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौकपर्यंत धावणारी ए सी 10 ही बस आता पी. डिमेलो मार्गे न जाता म्युझियम, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महात्मा फुले मंडई, मेट्रो, काळबादेवी, भुलेश्वर, जे. जे. रुग्णालय, माझगावमार्गे डॉकयार्ड रोड मार्गे शीव येथे जाईल.

नेव्ही नगर ते वांद्रे वसाहतपर्यंत धावणारी 11 मर्यादित ही बस भारतमाता उड्डाणपूल मार्गे धावणार असल्याने लालबाग, जयहिंद व जिजामाता उद्यान हे थांबे नसतील. बस क्र. 212 ही वांद्रे रेक्लमेशन बस स्थानकाहून शिवडीकडे जाताना हिंदमाता मार्गे न जाता शारदा सिनेमा, भोईवाडा मार्गे जाणार आहे.

शिवाजी नगर आगारहून दिंडोशीकडे जाताना बस क्र. ए 488 यापुढे कमानी बैल बाजार मार्गे न जाता असल्फा मार्गे जाईल. जोगेश्वरी पुलावरून जाणारी ए 180 ही बस गोखले पुलावरून धावेल. मंत्रालय ते वरळीपर्यंत धावणारी ए 89 बस यापुढे रविवारी धावणार नाही.

वरळी (worli) आगार ते कुलाबा बसस्थानकापर्यंत धावणारी ए 124 बस मंत्रालय ते वरळी आगार दरम्यान धावणारी ए89 बस आता रविवारी धावणार नाही. तर वरळी आगार ते कुलाबा बस स्थानक दरम्यान धावणारी ए 124 बस आता संपूर्ण आठवडा धावेल.

या साध्या बस होणार एसी

8 मर्या. मंत्रालय ते शिवाजी नगर टर्मिनस

44 श्रावण यशवंते चौक काळाचौकी ते वरळी आगार

125 वरळी आगार ते नेव्ही नगर

241 सांताक्रूझ आगार ते मालवणी आगार

243 मालाड स्थानक पश्चिम ते जनकल्याण नगर

343 गोरेगाव स्थानक पूर्व ते चित्रनगरी

347 गोरेगाव (goregaon) स्थानक पूर्व ते गोकुळधाम

452 गोरेगाव स्थानक पूर्व ते मयूर नगर

459 -मालवणी आगार ते मुलुंड स्थानक पश्चिम

602 कांजुरमार्ग स्थानक पूर्व ते हिरानंदानी

626 - मालाड स्थानक पश्चिम ते भूजल तलाव.


हेही वाचा

पाळीव कुत्र्याचा चावा, मालकाला ठोठावली शिक्षा

खोपोलीमध्ये आयुर्वेदिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार

पुढील बातमी
इतर बातम्या