एपीएमसीमध्ये गर्दी होऊ लागल्याने वेळेत बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच चालली आहे. वाढत आहे. एपीएमसीमध्ये मार्केटमध्ये रोज होणारी गर्दी काही प्रमाणात नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. एपीएमसीमधील भाजी मार्केटमध्ये रोज ७०० गाड्यांची आवक होते. त्यामुळे सकाळच्या वेळेस ८ ते १० हजार लोकांची एकाच वेळी गर्दी होत असते. यामुळे कोरोना नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने बाजाराच्या वेळेत बदल केला आहे.

भाजीपाला मार्केट रोज पहाटे २ वाजता सुरू होते. हे मार्केट आता मंगळवारपासून उद्यापासून संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. गर्दी विभागण्यासाठी ८ तासांऐवजी आता २४ तास भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. महाराष्ट्र आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक होत असते. संध्याकाळी ६ वाजल्यापासून भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाड्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रात्री १० वाजता व्यापारी वर्गाकडून व्यापार सुरू झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात भाजीपाला पोहोचवणाऱ्या गाड्यांना प्रवेश मिळणार आहे.

नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला, फळे, कांदा- बटाटा, घाना आणि मसाला असे पाच मार्केट आहेत. पाच मार्केटमध्ये दिवसाला ७ ते ८ हजार गाड्यांची आवक आणि जावक होत असते. त्यामुळे हजारोच्या संख्येने माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर, खरेदीदारांचा एपीएमसीमध्ये राबता असतो.


हेही वाचा -

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड 

बेड्स, रूग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 'हा' आहे क्रमांक


पुढील बातमी
इतर बातम्या