Advertisement

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

लोकल ट्रेनमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात सरकारनं अधिक आक्रमक होण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना लोकल प्रवासावेळी मास्क व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही प्रवासी विनामस्क प्रवास करत आहेत. परिणामी या कोरोनाला आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडात ३०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळे आता चेहऱ्यावर मास्क नसेल, तर ५०० रुपयांचा दंड बेजबाबदार नागरिकांना भरावा लागणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क घालणं अत्यावश्यक आहे. समाजमाध्यमांपासून ते विविध जाहिरातींच्या माध्यमातून रेल्वे प्रवााशांना मास्क घालण्याचे आवाहन सरकारच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशानुसार, रेल्वेत विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

सोमवार, ५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून हे नियम लागू झाले असून शुक्रवार, ३० एप्रिलपर्यंत हे लागू राहतील.

रेल्वे स्थानकांवर विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात दंड वसुली करण्यासाठी मुंबई महापालिकेने ३०० मार्शल्सची नियुक्ती केली आहे.

या मार्शलला २०० रुपये दंड आकारण्याची मुभा पालिकेने दिली होती.



हेही वाचा

NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा