NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

ड्रग्ज प्रकरणामुळं NCBच्या ताब्यात असलेल्या अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

दरम्यान ड्रग्ज प्रकरणामुळं NCBच्या ताब्यात असलेल्या अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. एजाजमुळं आता NCB अधिकाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपाखाली NCBनं ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शादाब बटाटा नामक एका ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यानं एजाजचं नाव घेतलं. त्यामुळं विमानतळावरुनच एजाजला पकडण्यात आलं.

ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी एजाजच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि NCB अधिकाऱ्यांना क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आलं आहे. एजाजवर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं उपचार सुरू आहेत.

मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्स माफियाशी एजाज खानचे संबंध असल्याची माहितीही एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्याचे मुंबईतील बटाटा गॅंगशी असलेले संबंध समोर आले आहेत. एजाजला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीच्या पथकानं मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरातही छापे टाकले.

एजाजला अटक करण्यापूर्वी, एनसीबीनं मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स पुरवठादार असणाऱ्या फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी अटक केली होती. शादाबच्या चौकशीनंतरच एजाजला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.



हेही वाचा

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

अंबानीच्या घराजवळ स्काॅर्पिओ पार्क करणारा सचिन वाझेचा ड्रायव्हर, एनआयएचा दावा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा