ड्रग्स प्रकरणी एजाज खान ३ दिवसांच्या NIA कस्टडीत

ड्रग्स प्रकरणात मंगळवारी अटक झालेला अभिनेता एजाज खानला ८ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी मुंबईतील NDPS कोर्टात सादर करण्यात आलं.

ड्रग्स प्रकरणी एजाज खान ३ दिवसांच्या NIA कस्टडीत
Symbolic photo
SHARES

ड्रग्स प्रकरणात मंगळवारी अटक झालेला अभिनेता एजाज खानला ८ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी मुंबईतील NDPS कोर्टात सादर करण्यात आलं. न्यायालयात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)नं एजाज खानबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

NCB नं सांगितल्याप्रमाणे, मागच्या आठवड्यात अटक करण्यात आलेला शादाब बटाटा आणि एजाज खानदरम्यान संबंध असल्याचं समोर आलं आहे. NCB ला आता दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, त्यामुळे एनआयएनं एजाजच्या ३ दिवसांच्या कस्टडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयानं मंजुर केली आहे.

मंगळवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं एजाज खानला मुंबई एअरपोर्टवरून ताब्यात घेतलं होतं. NCB च्या तपासात समोर आलं आहे की, शादाब तोच व्यक्ती आहे, जो एजाजला ड्रग्स पुरवायचा आणि एजाज हे ड्रग्स बॉलिवूडशी संबंधित लोकांना द्यायचा. याप्रकरणी लवकरच अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

NCB च्या एक अधिकाऱ्यानं एका वत्तपत्राला सांगितलं की, एजाजचे अनेक क्लाइंट TV इंडस्ट्रीशी संबंधित होते. त्यांच्यापर्यंत ड्रग्स पोहचवण्यासाठी एजाज व्हॉइस नोटचा वापर करायचा. ऑर्डर मिळताच रेकॉर्डिंग डिलीट करायचा. ड्रग्सबाबत बोलताना हा सीरियल आणि चित्रपटांच्या नावावरुन बनलेल्या कोडमधून बोलायचा.

NCB नं न्यायालयात सांगितलं की, त्यांच्याकडे एजाज खान आणि शादाब बटाटादरम्यान झालेल्या बोलण्याचा सीडीआर, व्हॉट्सअॅप चॅट आणि व्हॉइस रेकॉर्ड आहेत. यात एजाज ड्रग्सची ऑर्डर देणं आणि पैसे ट्रांसफर करण्याबाबत बोलत आहे. बटाटानंदेखील NCB च्या चौकशीत एजाजला ड्रग्स पुरवल्याचं कबुल केलं आहे.



हेही वाचा

अंबानीच्या घराजवळ स्काॅर्पिओ पार्क करणारा सचिन वाझेचा ड्रायव्हर, एनआयएचा दावा

मुंबई गुप्तवार्ता विभाग प्रमुखपदी मिलिंद काथे यांची नियुक्ती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा