ड्रग्स प्रकरणी अभिनेता एजाज खान NCBच्या ताब्यात

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मंगळवारी अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे.

ड्रग्स प्रकरणी अभिनेता एजाज खान NCBच्या ताब्यात
प्रतीकात्मक फोटो
SHARES

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मंगळवारी अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे. एजाज काही दिवसांपासून राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आज मुंबईत दाखल झाल्यावर NCB च्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं.

एजाज खानची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. एजाज बिग बॉस-७ मध्ये कन्टेस्टेंटसोबत झालेल्या मारहाणीमुळे प्रकाश झोतात आला होता.

NCB सूत्रांनी सांगितलं की, एजाज खान आणि ड्रग्सचे मुंबईतील सर्वात मोठे सिंडीकेट म्हणजेच बटाटा गँगशी संबंध आहेत. एजाजला पकडल्यानंतर एनसीबीनं मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरात छापेमारीदेखील केली. एजाजला पकडल्यापूर्वी एनसीबीनं मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी अटक केलं आहे.

एजाज खानला यापूर्वी २०१८ मध्ये बंदी घातलेली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यावेळेस त्याच्याकडून ८ एक्सटेसी टेबलेट मिळाल्या होत्या. याची बाजारातील किंमत २.२ लाख रुपये होती.



हेही वाचा

मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज पुरवठादाराच्या मुलाला अटक, २ कोटींचं ड्रग्ज जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा