मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज पुरवठादाराच्या मुलाला अटक, २ कोटींचं ड्रग्ज जप्त

एनसीबीनं महागड्या गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. या छापेमारीत एनसीबीच्या पथकाने नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे

मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज पुरवठादाराच्या मुलाला अटक, २ कोटींचं ड्रग्ज जप्त
SHARES

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटा याच्या मुलाला अटक केली आहे. शादाब बटाटा असं त्याचं नाव आहे. एनसीबीने त्याच्याकडून २ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे.

एनसीबीने गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या ठिकाणी छापा टाकला. यावेळी २ कोटी रुपयाचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं. याशिवाय एनसीबीनं महागड्या गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. या छापेमारीत एनसीबीच्या पथकाने नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे

शादाब बटाटा मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनाही ड्रग्ज पुरवठा करायचा. शादाबचा तपास एनसीबी गेल्या अनेक दिवसांपासून करत होती. मुंबईमध्ये एमडीएमएशिवाय विदेशातून येणाऱ्या एलएसजी, गांजा, कोकीन यासारख्या ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा फारुख बटाटावाला करतो. हाय प्रोफाईल लोकांमध्ये त्याची चांगली ओळख आहे. मुंबईतील प्रत्येक बार आणि मोठ्या ड्रग्ज पार्टीमध्ये तोच ड्रग्ज पुरवतो.

फारुख सुरुवातीला बटाट्याची विक्री करायचा. याचवेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला. आता तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार आहे.  त्याचं संपूर्ण काम त्याची दोन मुलं सांभाळतात. 



हेही वाचा - 

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा