Advertisement

सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीवर अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळवलं आहे.

सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
SHARES

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीवर अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळवलं आहे.

घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही दाखल झाल्या असून, त्यांनी बचावकार्य वेगानं करण्याचे आदेश दिले होते. सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते.

सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्यानं ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा