नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बंधन बँक (Bandhan Bank) सह अनेक बँकांनी पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत.
या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन ATM वापरावर होणार आहे. या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे UPI-आधारित ATM व्यवहार.
आतापर्यंत कार्डशिवाय (UPI) पैसे काढणे वेगळ्या प्रकारात गणले जात होते. मात्र, आता अशा व्यवहारांनाही मासिक ‘फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट’मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
तसेच त्यामुळे UPI वापरून ATM मधून पैसे काढल्यास तेही फ्री व्यवहारांमध्ये मोजले जाणार आहेत.
ग्राहकांना दर महिन्याला ठराविक संख्या फ्री ट्रान्झॅक्शनची (free transaction) सुविधा मिळते. सध्या बँकेच्या ATM मध्ये साधारण 5 फ्री ट्रान्झॅक्शन मिळतात. इतर बँकांच्या ATM मध्ये मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 व्यवहार मोफत असतात.
ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये (कर वगळून) शुल्क आकारले जाणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने काही डेबिट कार्डसाठी दैनंदिन पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल केले आहेत. काही कार्डांवरील मर्यादा 1,00,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे.
तसेच काही कार्डांवरील मर्यादा 1,15,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आली आहे.
बंधन बँकेनेही ATM व्यवहारांसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. स्वतःच्या ATM मध्ये ग्राहकांना दर महिन्याला 5 आर्थिक व्यवहार मोफत मिळणार आहेत.
तसेच नॉन-फायनान्शियल व्यवहारांवर कोणतीही मर्यादा नाही. इतर बँकांच्या ATM मध्ये मुंबई (mumbai), पुण्यासह (pune) मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहारांची मर्यादा असेल.
या मर्यादेनंतर आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये आणि नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठी 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने व्यवहार फेल झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाईल.
UPI-आधारित ATM व्यवहारांमुळे आता डेबिट कार्डशिवायही पैसे काढणे शक्य झाले आहे. ग्राहक QR कोड स्कॅन करून मोबाईलद्वारे व्यवहार पूर्ण करू शकतात.
मोठ्या व्यवहारांसाठी UPI, नेट बँकिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे.
या नव्या नियमांनुसार ग्राहकांनी आपल्या डेबिट कार्डची मर्यादा तपासणे, मासिक व्यवहारांची संख्या लक्षात ठेवणे आणि अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी नियोजन करून ATM चा वापर करणे गरजेचे आहे.
1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या ATM नियमांमुळे UPI व्यवहारही फ्री लिमिटमध्ये मोजले जाणार आहेत.
मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. तसेच काही कार्डांवरील पैसे काढण्याची मर्यादाही कमी करण्यात आली आहे.
तसेच त्यामुळे ग्राहकांनी वेळेत माहिती घेऊन आपला व्यवहार अधिक नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे.
हेही वाचा