मुख्यमंत्र्यांचे पाणी जपून वापरण्याचे निर्देश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील (maharashtra) विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता.

मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा (water shortage) मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो (al nino) प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.

जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.

एल-निनोच्या प्रभावामुळे साठ्यात 2014 मध्ये 12 टक्के तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली.

15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी तर याच दिवशी 2015 ला 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : (टिएमसीमध्ये)

कोयना : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 33.62, गतवर्षीचा पाणीसाठा 36.76 टिएमसी.

जायकवाडी : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 42.03, गतवर्षीचा पाणीसाठा 34.44 टिएमसी.

उजनी : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 13.39 , गतवर्षीचा पाणीसाठा - (0)

पेंच प्रकल्प समूह : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 26.57, गतवर्षीचा पाणीसाठा 26.35 टिएमसी.

इसापूर : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 21.45, गतवर्षीचा पाणीसाठा 17.82 टिएमसी.

भातसा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 15.70, गतवर्षीचा पाणीसाठा 14.91 टिएमसी.

गोसीखुर्द : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 14.31, गतवर्षीचा पाणीसाठा 5.93 टिएमसी.

खडकवासला धरण समूह : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 11.32, गतवर्षीचा पाणीसाठा 9.82 टिएमसी.

मुळा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 9.54, गतवर्षीचा पाणीसाठा 10.53 टिएमसी.

अप्पर वर्धा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - 10.21, गतवर्षीचा पाणीसाठा 9 टिएमसी.


हेही वाचा

बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतात प्रथमच जपानच्या 'या' ट्रॅक प्रणालीचा वापर

मेट्रो 5 च्या विस्ताराला मंजुरी

पुढील बातमी
इतर बातम्या