'या' मुलांनी दादरमध्ये केला 'फ्लॅशमॉब'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

संपूर्ण देशात मंगळवारी 14 नोव्हेंबरला बालिदन साजरा होत आहे. पण रेड लाईट एरीयात राहणारी मुले आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ही मुल इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेऊ शकत नाही. यांचे बालपण अतिशय खडतर असते. अनेकदा ही मुले सगळ्यांसमोर यायलाही घाबरतात. जगातील लहान मुलांना निरागस बालपण सुखाने अनुभवता यावे या उद्देशाने देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांनी दादर स्टेशन परिसरात 'फ्लॅशमाॅब’ सादर केला.

फ्लॅशमॉब सादर करत दिला सामाजिक संदेश

बालदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल ॲक्टिव्हीटीज इंटिग्रेशन (साई) या संस्थेच्या माध्यमातून या मुलांनी मंगळवारी दादर स्टेशन परिसरांत फ्लॅशमाॅब’ सादर केला.

जगात शांतता नांदावी. लहान मुलांना आनंदाने-सुखाने बालपण उपभोगता यावे, असा संदेश फ्लॅशमाॅबद्वारे या मुलांनी दिला. या फ्लॅशमाॅबला दादरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लोकांनी देखील गर्दी करत या मुलांना प्रोस्ताहन दिले.

आज जगात कोणतीही अतिरेकी घटना घडली तर तिचा पहिला बळी ही लहान मुले असतात. निव्वळ लहान मुलांचा दिवस म्हणून बालदिन साजरा न करता जगभरातील लहान मुलांच्या शांततामय आयुष्य आणि त्यांच्या निरागस आनंदासाठी एक संदेश द्यायचा होता. यासाठी मुलांनी फ्लॅशमाॅब हा आधुनिक नृत्याविष्कार निवडला.

- विनय वस्त, साई संस्थेचे संस्थापक


हेही वाचा - 

सेक्स वर्कर्सच्या मुलींची 'लालबत्ती एक्स्प्रेस'!


पुढील बातमी
इतर बातम्या