नवी मुंबई (navi mumbai) आणि आसपासच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध करून देणाऱ्या सिडकोकडून (CIDCO) आता एक महत्त्वाकांक्षी नवा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
मंगळवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
या धोरणांतर्गत राज्य शासन आणि सिडकोच्या ताब्यातील मोठ्या भूखंडांचा सुयोग्य वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाची 'आयकॉनिक' शहरे विकसित केली जातील.
फक्त सिडकोच नाही, तर राज्यातील (maharashtra) विविध प्राधिकरणांकडील (Authorities) भूखंडांचा योग्य वापर व्हावा यासाठी 'आयकॉनिक शहर विकास' म्हणजेच 'आदर्श शहर विकास' धोरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
या धोरणामुळे प्राधिकरणांच्या जमिनींचा योग्य वापर निश्चित करणे आणि विकासाला चालना देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कॅबिनेटच्या निर्णयानंतर, सिडकोकडे नवी मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत.
या भूखंडांचा वापर करण्यासाठी विकासकांना मोठ्या संधी मिळणार आहेत. 'Unified Development Control and Incentives Regulations, 2020' नुसार भाडेतत्त्वावर (Lease) हा विकास केला जाईल.
या टाऊनशिप्स विविध संकल्पनांवर (Themes) आधारित असतील. यामध्ये एकात्मिक वसाहती (Integrated Townships) उभारल्या जातील.
ज्यात शाळा, रुग्णालये, राहण्याचे ठिकाण आणि काम करण्याची जागा एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. मुख्यतः पुढील संकल्पनांवर आधारित टाऊनशिप विकसित होतील असं सांगितलं जात आहे.
त्याचा फायदा सर्व सामान्यांना होणार आहे. शिवाय एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधाही मिळतील. त्यामुळे या टाऊनशिपबाबत आतात उत्सुकता निर्माण झाली आहे.
कुठे उभारल्या जाणार टाऊनशिप्स?
हेही वाचा