Advertisement

दहा वर्षांतील विक्रमी थंडी, मुंबईचे तापमान 16.2°C

सरासरी तापमानापेक्षा जवळपास पाच अंशांनी कमी आहे.

दहा वर्षांतील विक्रमी थंडी, मुंबईचे तापमान 16.2°C
SHARES

मुंबईत बुधवारी सकाळी नेहमीपेक्षा जास्त थंडीची नोंद झाली. किमान 10 वर्षांतील सर्वात थंड नोव्हेंबरची सकाळ अशी नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने किमान 16.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले, जे सरासरी तापमानापेक्षा जवळपास पाच अंशांनी कमी आहे.

2014 नंतर प्रथमच नोव्हेंबरमध्ये इतके कमी किमान तापमान नोंदवले गेले आहे. यामुळे शहरावर आलेल्या अकाली थंडीच्या लाटेची तीव्रता दिसून येते. त्याच्या तुलनेत, किनाऱ्याजवळील कोलाबा वेधशाळेने 21.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवले, जे मुंबईतील किनारी आणि अंतर्गत भागांतील तापमानातील फरक स्पष्ट करतो.

भारत मौसम विज्ञान विभागानुसार (IMD), यंदा नोव्हेंबर महिन्यात मुंबईत हिवाळ्याची लवकर चाहूल लागली आहे. 9 नोव्हेंबरपासून शहरात किमान तापमान 20 अंश सेल्सियसखाली गेला. गेल्या अनेक दिवसांत तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी राहिले असून बुधवारी सर्वात कमी नोंद झालेली.

इंडियन एक्सप्रेसने IMD च्या आकडेवारीवरून दिलेल्या वृत्तानुसार, ही किमान 10 वर्षांतील मुंबईची सर्वात थंड नोव्हेंबर सकाळ आहे. यापूर्वी 11 नोव्हेंबर 2016 रोजी 16.3 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदले गेले होते. 2024 मध्ये तापमान 16.5 अंशांवर आले होते.

हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळा अद्याप सुरू झाला नाही. IMD च्या वर्गीकरणानुसार, मुंबईतील अधिकृत हिवाळा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असतो. सध्या जाणवणारी थंडी मध्य भारत आणि द्वीपकल्पीय भागातून वाहणाऱ्या सततच्या उत्तरेकडील आणि ईशान्येकडील वाऱ्यांमुळे आहे. या वाऱ्यांमुळे मुंबईत थंड व कोरडी हवा पोहोचत असून तापमानात तात्पुरती घट झाली आहे.

पुढील काही दिवसांत किमान तापमान वाढणार

IMD च्या अंदाजानुसार, ही थंडी जास्त काळ टिकणार नाही. पुढील दिवसांत किमान तापमान पुन्हा 20 अंश सेल्सियसच्या वर जाईल, कारण थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होणार आहे.

2 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 27 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. मात्र, ती घट हंगामी वाऱ्यांमुळे नव्हे तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

सांताक्रुझ ते बीकेसी उन्नात मार्गाचे काम 80 टक्के पूर्ण

प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 170 प्रकल्पांना नोटीस

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा