उरण-पनवेल रस्ता बंद, वाहनधारकांचा प्रवास धोक्याचा

Representational Picture
Representational Picture
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बोकडविरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका हा रस्ता  दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, अनेक दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालक त्याच ठिकाणी  उपलब्ध असलेल्या छोट्या रस्त्याने ये-जा करत आहेत. अशा निमुळत्या रस्त्याने प्रवास करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत.

महत्त्वाच्या उरण-पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानक आणि आनंदी हॉटेलचे दोन्ही फाटक खराब झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बोकडविरा उड्डाणपुलापासून रस्ता बंद केला आहे. 

बोकडविरा ते नवीन शेवा उड्डाणपूल ते उरण या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येत आहे. मात्र हा मार्ग सातत्याने बंद केला जात आहे. दुसरीकडे, नवी मुंबई सेझ रस्त्यावर खड्डे, खडी आणि धूळ असल्याने दुचाकीस्वारांसाठी प्रवास धोकादायक बनला आहे.


हेही वाचा

पावसाळ्यात 'सिडको'ची 65 हजारांपेक्षा जास्त सदनिकांची लॉटरी

लोअर परळ उड्डाणपुलाची एक लेन 'या' महिन्यापर्यंत खुली होणार

पुढील बातमी
इतर बातम्या