दारूविक्रीचा गोंधळ संपणार, मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांनी काढला 'हा' आदेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कटेंन्मेंट झोन वगळून रेड झोनमध्येही मद्यविक्रीला परवानगी देण्यात आलेली असली, तरी अद्याप काही ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत, तर काही ठिकाणी ती उघडण्यात आली आहेत. एकल दुकानं सुरू करण्याबरोबर मद्य विक्री करण्यासही सरकारनं सशर्त परवानगी दिली. तरीही हा गोंधळ असल्याने मुंबई शहर, उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीबाबतचा आदेश काढला आहे.

हेही वाचा - वॉईन शॉपबाहेर तळीरामांची तुफान गर्दी

दारू खरेदीसाठी झुंबड

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्यानं मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन तळीरामांना करावं लागत आहे.

काय आहे आदेशात?

  • मद्याचे घाऊक/ ठोक विक्रेत्यांबाबत: 
  • ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील.
  • शहरी भागातील कटेंन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. तथापी सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत.
  • भारत सरकार, गृह मंत्रालय आदेश क्र. ४०-३/२०२०-डीएम-१(ए) १ मे २०२० मधील परिशिष्ट -। नुसार कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे घाऊक विक्रेत्यांवर बंधनकारक राहतील.
  • संबंधित अनुज्ञप्तीमधील सर्व नोकरांची/कामगारांचीथर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास किंवा कामगारास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, त्यांना अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देऊ नये.
  • घाऊक विक्रेत्यांनी ५० टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डिस्टन्सिंग पाळावे.

पोलिसांकडून मज्जाव

एका बाजूला अशी परिस्थिती असताना मद्यविकीची दुकाने अर्थात वाईन शाॅप सुरू करण्यास पोलिसांकडून काही ठिकाणी मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे मद्यविक्री दुकाने सुरू ठेवायची की नाही यावरून गोंधळ दिसून येत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी यांनी मद्य विक्री सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. 

हेही वाचा - मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या