Advertisement

वॉईन शॉपबाहेर तळीरामांची तुफान गर्दी


वॉईन शॉपबाहेर तळीरामांची तुफान गर्दी
SHARES

राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं मागील दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी सोमवारी सकाळी वाईन शॉपची दुकानांबाहेर मोठी गर्दी केली. तुफान गर्दी होऊन वाहतुकीची कोंडीही झाल्यानं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्यानं मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं.

या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन लोकांना करावं लागलं.

काही तळीराम दुचाकींवरून आल्यानं चेंबूर कँम्पमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. दादर शिवाजी पार्क, काळाचौकी, घाटकोपर, कुर्ला, सायन कोळावाडा, कल्याण आणि इतर भागातही हीच परिस्थिती होती.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा