लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्कचा वापराचा विसर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरिही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळत असल्याचं पाहायला मिळतं. असंच काहीस चित्र मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळं पुन्हा एकदा लोकल प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या स्थानकांत नेहमीच ही दृष्य पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अशा प्रवाशांविरोधात रेल्वेकडून कारवाईचा वेग मंदावला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या ऑगस्टपासून सप्टेंबपर्यंत मध्य रेल्वेवर ५०० हून अधिक आणि पश्चिम रेल्वेवर महापालिका व रेल्वेनं केलेल्या एकत्रित कारवाईत ३ हजारांपेक्षा जास्त प्रवासी सापडले आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेक प्रवासी मास्कशिवाय लोकल प्रवास करीत आहेत. काहीजण मास्क हनुवटीवर ठेवून प्रवास करताना दिसतात, तर काही प्रवाशांचा मास्क खिशात वा हातात दिसतो.

मध्य रेल्वेवरील ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी, मुंबई सेन्ट्रल, चर्चगेट यांसह काही गर्दीच्या स्थानकांत फेरफटका मारल्यास प्लॅटफॉर्मवर उभे असलेले अनेक प्रवासी हे विनामास्क चर्चा करत असतात.

पुढील बातमी
इतर बातम्या