मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये नाश्त्यावरून वाद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (mumbai)-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (tejas express)प्रवाशांना नाश्त्याऐवजी 10 रुपयांचा बिस्किटाचा पुडा आणि जेवणात आधी ठरलेल्या पदार्थांऐवजी अन्य पदार्थ दिल्याच्या तक्रारीची आयआरसीटीसीने दखल घेतली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आयआरसीटीसी पश्चिम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावला.

विशेष म्हणजे, जागरूक प्रवाशाने ‘पीजी पोर्टल’वर तक्रार दाखल केल्यानंतर एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणेकडून तातडीने दखल घेत संबंधित कंत्राटदाराला सक्त ताकीद देण्यात आली.

मडगाव तेजस एक्स्प्रेस मधून कुडाळ ते ठाणे (thane) असा प्रवास करणारे प्रवासी श्रेयस पटवर्धन यांनी प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणासाठी नियमानुसार पैसे भरले.

मात्र नाश्त्यामध्ये बिस्किटाचा पुडा आणि जेवणामध्ये अन्य पदार्थ दिल्याने त्यांनी ‘एक्स’सह ‘पीजी पोर्टल’वर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, तथ्य आढळून आले.

यामुळे कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला. तसेच सक्त ताकीद देण्यात आली, असे आयआरसीटीसीच्या (IRCTC) पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ शी बोलताना सांगितले.

अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी रेल्वे प्रवास सुरू होण्यापूर्वी रेल्वेगाड्यांमधील पर्यवेक्षकाकडून तपासणी करावी आणि त्याचा अहवाल रोज पाठवावा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशाने ‘रेल मदत’वर तक्रार केली असता, संबंधित प्रवाशांना भेटून तक्रार सोडवण्यात आली, असे सांगून तक्रार परस्पर बंद करण्यात आली. 

पीजी पोर्टल वरील तक्रारीची दखल घेण्यात आली. त्यानंतर एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणेकडून संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला. तसेच सक्त ताकीद देण्यात आली, अशी माहिती देत गुरुवारी तक्रारीचे निरसन झाल्याचे जाहीर केले.


हेही वाचा

इलेक्ट्रिक वाहनांसाठी 8 चार्जिंग स्टेशन उभारणार

वैयक्तिक फ्लॅट मालकांना मालमत्तेची कागदपत्रे मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या