धारावीतील डॉक्टरला कोरोनाची लागण, हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारत सील

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

 धारावीत 35 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्या हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारतही सील करण्यात आली आहे. या इमारतीत 300 लोक राहतात.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 235 रुग्ण आढळले आहेत. धारावीमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता आणखी एक रुग्ण येथे आढळला आहे. 35 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याचे हाॅस्पिटल आणि तो राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.

इमारतीमध्ये एकूण 48 फ्लॅट आहेत आणि कोरोनाचं संक्रमण वाढू नये या उद्देशानं या बिल्डिंगला सील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता इथून कोणालाच बाहेर जाता किंवा बाहेरुन आत येता येणार ना. या इमारतीतल्या वयोवृद्ध लोकांची यादी तयार केली जात आहे. याशिवाय 25 जास्त संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली आ. जोपर्यंत जास्त संपर्कात आलेल्या लोकांच्या टेस्ट केल्या जात नाही तोपर्यंत या इमारतीतल्या सर्व लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचा पुरवठा पालिकेकडून केला जाणार आहे.


हेही वाचा -

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद


पुढील बातमी
इतर बातम्या