मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
SHARES

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. प्रथमच पीएचडी व एमफिलसाठी स्वतंत्र अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी संपूर्ण देशातून ६८४८ अर्ज प्राप्त झाले असून, इतर २९ राज्यांतील ५१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पेट परीक्षेसाठी ६५१२ विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी तर ३२६ विद्यार्थ्यांनी एमफिलसाठी अर्ज केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सन २०१६च्या निर्देशानुसार विद्यापीठाने डिसेंबर, २०१८मध्ये पीएचडी व एमफिल प्रवेशासाठी प्रथमच ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली होती. यंदाच्या दुसऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे अर्ज २७ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत स्वीकारण्यात आले. 

यंदा प्रथमच पीएचडी व एमफिल या दोन्ही परीक्षांसाठी स्वतंत्र अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये पीएचडीसाठी ७८ विषयांसाठी तर एमफिलसाठी २५ विषयांसाठी ही प्रवेश परीक्षा होणार आहे. सन २०१६पासून आजपर्यंत पीएचडीच्या पेट परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. सन २०१६मध्ये ३३५० विद्यार्थी होते, तर सन २०१८मध्ये ही संख्या ६१६८ एवढी होती. तर यावर्षी ६५१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही वाढ मागील वर्षापेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहे. 

महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या ६०५१ आहे, तर महाराष्ट्राबाहेरील इतर २९ राज्यांमधून पीएचडीसाठी ४६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पीएचडीसाठी एकूण ६५१२पैकी २७७३ मुले असून, ३७३९ मुली आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी मुलींची संख्या सर्वाधिक आहे. यावर्षी आलेल्या पीएचडी अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत असून, यात ३३४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्या खालोखाल मानव्यविद्या शाखेसाठी १६९१, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ११४८, तर आंतरविद्या शाखेसाठी ३३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.हेही वाचा -

संबंधित विषय