मुंबई, पुण्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई आणि पुण्यामध्ये बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सोमवारी राज्यात बरे झालेल्या ३५० कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात इतक्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

 मुंबईसह पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यात मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

सोमवारपर्यंत राज्यात एकूण दोन हजार ४६५ करोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.


हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ


पुढील बातमी
इतर बातम्या