Advertisement

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के


कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के
SHARES

कोरोना व्हायरसनं मुंबईला चांगलंच टार्गेट केलं आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झाली असून झोपडपट्ट्यांमधील कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण ६० टक्के असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतील वरळी, धारावी, गोवंडीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असतानाच २ दिवसांपूर्वी मुलुंडच्या झोपडपट्टीत एका दिवसात ५० रुग्ण आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र आळा घालण्यासाठी तसंच, नवे कोरोना रुग्ण वाढू नये आणि उपचार घेत असलेले रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी, प्रयत्न करतानाच झोपडपट्ट्यांमध्ये वाढणारं मृत्यूचं प्रमाण रोखण्याची कसरत आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे.

मुलुंडमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण सापडणं हे सौम्य ट्रान्समिशनचं लक्षण असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत १९२७ कंटेन्मेंट झोन होते. त्यातील ८० टक्के कंटेन्मेंट झोन हे झोपडपट्ट्या आणि चाळीत आहेत. पालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या एका सर्व्हेनुसार मुंबईतील करोनाचे ६० टक्के मृत्यू हे झोपडपट्ट्या आणि झोपडपट्टी सदृश्य परिसरातील आहेत.

यामधील ६४१ कंटेन्मेंट झोन हे रेड झोनमधील आहेत. तर ५०२ कंटेन्मेंट झोन हे ऑरेंज झोनमधील आहेत. मात्र, या ऑरेंज झोनमधील करोना संसर्गाचं प्रमाण नियंत्रणात असल्याच पालिकेनं स्पष्ट केलं. धारावी परिसर सुद्धा रेड झोनमध्ये असून या ठिकाणी सर्वाधिक ६३२ करोनाबाधित आढळून आले आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर हा १०० टक्के परिसर झोपडपट्टीचा आहे. एम पूर्व प्रभागात मोडणाऱ्या या विभागात ४६० करोना रुग्ण आढळून आले असून या ठिकाणी आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकट्या मानखुर्द ते शिवाजी नगर परिसरातच ६० टक्के करोनाबाधित आढळून आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा