मुंबईत सोडिअम हायड्रोक्लोराईडची फवारणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशासह राज्यभरात कोरोनाचा विळखा वाढलेला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून  मुंबई महापालिकेनं कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं सार्वजनिक रुग्णालय, गर्दीची ठिकाण, वर्दळीच्या रस्त्यांवर कोरोना जंतूनाशक फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. पालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमानाने ही फवारणी केली जात आहे.

 हेही वाचाः- Corona virus: आता कोरोनाची टेस्ट घर बसल्या करता येणार

महाराष्ट्रात आता कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १०१ वर जाऊन पोहचला आहे. अवघ्या काही दिवसात या संसर्ग रोगाचा झालेला फैलाव लक्षात घेता खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी सर्वात जास्त असते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान रुग्णालय, वरदळीची सार्वजनिक ठिकाण, बसगाड्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. 

 हेही वाचाः- भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता

नुकतीच अग्निशमन दलाने परळच्या के.ई.एम रुग्णालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाण्यात सोडिअम हायड्रोक्लोराईड मिसळून ते क्विक रिसपाॅन्स गाड्यातून परिसरात फवारणी केली आहे. अशा प्रकारे इतर ठिकाणीही मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली होती. 

या ठिकाणी होत आहे कोरोना टेस्ट

कस्तुरबा रुग्णालय, भायखळा

जे.जे.महाविद्यालय अस्पताल,नागपाडा

हाफकिन इन्स्टिट्यूट, परळ 

खासगी कोरोना टेस्ट केंद्र

पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर, 

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, 

टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर,

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, 

थायरोकेयर लॅबरोटरीज,

एस.आर. एल. डायग्नोस्टिक

रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई

पुढील बातमी
इतर बातम्या