Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता

मुंबईला दररोज नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून होणारी भाज्यांची आवक बुधवारपासून बंद करण्यात आली आहे.

भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता
SHARES

मुंबईला दररोज नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून होणारी भाज्यांची आवक बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाज्या पोहोचवण्यास वाहतूकदारांनी असमर्थता दर्शवली आहे. तसंच, मागणी देखील घटल्यानं व्यापाऱ्यांनी मंगळवारी उरलेला सर्व माल विकला. बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार पूर्णपणे बंद असणार आहे. 

भाज्यांची आवक बंद होणार असल्यानं भाजीपाला महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनाच्या उद्रेकामुळं सध्या रस्त्यावरील भाजीबाजार, मॉल्स तसंच, हॉटेल्स व रेस्टॉरंटसुद्धा बंद असल्यानं भाज्यांची मागणी घटली आहे. त्यामुळं बाजारात भाज्यांच्या गाड्या विक्रीविना पडून आहेत. अशा जवळपास ४५० गाड्या भाज्यांची सोमवारपर्यंत विक्री झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई शहर व उपनगरासह ठाणे जिल्ह्याची रोजची मागणी एरव्ही ६०० ट्रकच्या घरात असते. पण सध्या भाज्यांची खरेदी-विक्री असलेली अनेक ठिकाणं बंद असल्यानं ही मागणी ३०० किलोपर्यंत उतरली आहे. त्याचप्रमाणं यामधूनच ४५० ट्रक भाजी शिल्लक असल्याची माहिती मिळते. त्यामुळं व्यापाऱ्यांनाही मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे.

नवी मुंबईच्या भाजीपाला बाजारात दररोज ग्राहकांच्या तसेच शेतमालासंबंधी दररोज २ हजारांहून अधिक गाड्या येतात. एकाचवेळी १० हजारहून जास्त नागरिकांची वर्दळ इथं असते. त्यामुळं संसर्ग वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्या असल्यामुळं राज्य सरकारनं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा