१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. रेल्वे मंत्रालय पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. काही शहरांमधून विशेष रेल्वे सुरू होऊ शकते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना मोठी मदत मिळू शकते.

'या' मार्गावर सुरू होणार रेल्वे

एएनआय या वृत्तसंस्थेनं केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे १२ मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यानुसार टप्प्याटप्प्यानं रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर ३० रिटर्न ट्रेन सुरू होतील. या विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जातील. नवी दिल्ली, दिलबर्गा, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू या प्रमुख स्थानकांपर्यंत रेल्वे जाणार आहेत.

ऑनलाईन बुकिंग

यासाठी ११ मेपासून सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे बुकिंग IRCTC च्या वेबसाइटवर ऑनलाइन करण्यात येईल. तिकीट खिडकी सुरू नसणार असंही सांगितलं जात आहे. याशिवाय प्रोटोकॉल नियमाचे पालन करणं अनिवार्य आहे.


हेही वाचा

यूपीसाठी १० विशेष ट्रेन, तर प. बंगाने परवानगी नाकारली- देवेंद्र फडणवीस

घरवापसीसाठी एसटीच्या मोफत बस, प्रवासासाठी 'अशी' असेल प्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या