Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

घरवापसीसाठी एसटीच्या मोफत बस, प्रवासासाठी 'अशी' असेल प्रक्रिया

लाॅकडाऊनमुळे राज्यभरात ठिकठिकाणी अडकलेले विद्यार्थी, मजूर, नोकरदार, प्रवासी यांच्या घरवापसीसाठी सोमवार ११ मे २०२० पासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा (एसटी)च्या मोफत बस सोडण्यात येतील.

घरवापसीसाठी एसटीच्या मोफत बस, प्रवासासाठी 'अशी' असेल प्रक्रिया
SHARES

लाॅकडाऊनमुळे राज्यभरात ठिकठिकाणी अडकलेले विद्यार्थी, मजूर, नोकरदार, प्रवासी यांच्या घरवापसीसाठी सोमवार ११ मे २०२० पासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा (एसटी)च्या मोफत बस सोडण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी हा मोठा दिलासा दिला. 

सरकारकडून प्राधान्य स्तरावर परप्रांतीयांना राज्याबाहेर जाण्याची व्यवस्था होत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थानिकांसाठी कुठलीही व्यवस्था होत नसल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने पावलं उचलून अखेर स्थानिकांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. याबाबत अनिल परब यांनी विस्ताराने माहिती दिली.

हेही वाचा- परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठी नियोजन सुरू- अनिल परब


'अशी' असेल प्रक्रिया

त्यानुसार, एकाच जिल्ह्यात किंवा गावी जाणाऱ्या केवळ २२ जणांची एक यादी करून ती यादी पोलीस ठाण्यात द्यावी लागेल, गावातील लोकांना ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी लागेल. यामध्ये त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायाचं आहे, याची माहिती लिहावी लागेल. कुणीही पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात परवानगी मिळवण्यासाठी गर्दी करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.  

फक्त २२ प्रवासी

२२ प्रवासी झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचं ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत उभ्या बसमध्ये त्यांची व्यवस्था केली जाईल. एसटीत केवळ २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असेल. मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश असेल. प्रवासापूर्वी आणि नंतर एसटीचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येईल. गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील असंही अनिल परब यांनी सांगितलं.

हेही वाचा- लवकरच मुंबईहूनही सुटणार विशेष रेल्वे, मुख्यमंत्र्यांचे संकेत 

खासगी वाहनानेही मुभा

मुंबई आणि पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना या बसने प्रवास करता येणार नाही. तसंच १८ मे पर्यंतच ही बससेवा सुरु राहणार आहे. त्यानंतर, राज्य सरकारच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. खासगी वाहनाने वैयक्तिक प्रवास करणाऱ्यांना तशी परवानगी देण्यात येईल.

आॅनलाईन पोर्टल

या एसटी बसच्या नोंदसाठी ऑनलाईन पोर्टल सोमवारपासून सुरू करण्यात येईल. या ऑनलाईन पोर्टलद्वारेही प्रवाशांना नोंदणी करता येईल. 


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा