मुंबईतल्या 'या' ८ वॉर्ड्समध्ये १० हजारहून अधिक रुग्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरात एकूण २ लाख १७ हजार ११३ रुग्ण आढळले आहेत. अनेक भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं सामाजिक अंतर आणि नियमांचं पालन करण्यासाठी कडक कारवाई केली आहे.

पालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की, ६ सप्टेंबर २०२० पर्यंत मुंबईतील एकूण आठ वॉर्डांमध्ये १० हजारपेक्षा जास्त COVID 19 चे रुग्ण आढळली आहेत. शिवाय, २४ पैकी १५ वॉर्डांमध्ये १ हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. शहरात एकूण २९ हजार ४६२ सक्रिय रूग्ण आहेत. ज्यांचावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवाय, मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर १.०4 टक्के आहे. मुंबईतील ११ वॉर्डांमध्ये रुग्ण वाढीचा दर १.०४ या सरासरीपेक्षा अधिक आहे. वॉर्ड आर-सेंट्रल आणि एच-वेस्ट अनुक्रमे १.४३ आणि १.३८ टक्क्यांसह यादीत अव्वल आहे. दरम्यान, शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा दर ६७ दिवसांवर आहे. ११ प्रभागांमध्ये उल्लेख केलेल्या सरासरीपेक्षा कमी आहे.

दहिसर, मालाड, दादर, अंधेरी, भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात घेत अधिकाऱ्यांनी मुंबईतील ६५१ भाग आणि १० हजार ०९७ इमारती सील केल्या आहेत.


हेही वाचा

राज्यातील २ कोटी लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार जास्त वेळ सुरू राहणार

पुढील बातमी
इतर बातम्या