Advertisement

राज्यातील २ कोटी लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील २ कोटी लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
SHARES

राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेचा मोठा लाभ लाॅकडाऊनच्या काळात कष्टकरी, गरजूंना झाला. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (2 crore shiv bhojan thali distribution in maharashtra)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारी, २०२० रोजी शिवभोजन थाळी योजनेला सुरूवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अवघ्या १० रुपयांत राज्यातील गोरगरीबांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ५ रुपयात शिवभोजन देण्याच्या निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

हेही वाचा - Shiv Bhojan Thali: राज्यात १ कोटी शिवभोजन थाळ्यांचं वाटप

कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसंच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे.

शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ८४ हजार ०४०, ३० लाख ९६ हजार २३२ लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार ४७४, ऑगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार ३१९, सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार १७६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख ९ हजार १७६ अशा एकूण १ कोटी ९९ लाख ३७ हजार ४९२ गरीब आणि गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा