नायर रुग्णालयातील कोरोना वॉर्डात डॉक्टरांवर पडला पंखा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णावर उपचार करत असताना २६ वर्षीय डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडला आणि त्यात जखमी झाला. 

रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरू आहेत. 'जखमी डॉक्टर अॅनेस्थेशिया विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले आहे. चाचणी अहवाल साधारण आहेत. 

डॉक्टरांना एका दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

राज्यात मंगळवारी २१०० नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा हा ३७,१५८ वर पोहोचला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 


हेही वाचा -

घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन


पुढील बातमी
इतर बातम्या