Coronavirus updates: रेल्वेचे तत्काळ तिकीट मिळणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु, १ जूनपासून रेल्वे प्रशासनानं २०० स्पेशल ट्रेन चालविण्यास सुरूवात केली. तसंच, कालांतरान लोकल सुरू झाली. देशभरातील २०० विशेष ट्रेन आणि देशातील निवडक १५ मार्गावरून राजधानी ट्रेन धावत आहे. या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासुन देशातील रेल्वेची प्रवासी वाहतुक पुर्णपणे बंद आहे. त्यानंतर सर्व सामान्य प्रवाशांसाठी देशातील निवडक १५ मार्गावर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासुन २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. मात्र या ट्रेनचं तत्काळ तिकीट रेल्वेकडून दिले जात नव्हते. मात्र आता २९ जूनपासून हि सुविधा प्रवाशांसाठी सुरु झाली आहे.

अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेनं सोमवारपासून लोकलच्या ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास आणि कामावार जाण्यास अधिक सोयीचं होणार आहे. तसंच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर जपत प्रवास करता येणार आहे.

चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर २० फेऱ्या, चर्चगेट-विरार जलद मार्गावर १४ फेऱ्या वाढवण्यात येतील. तसेच बोरिवली- वसई रोड धीमा मार्ग, वसई रोड-चर्चगेट जलद मार्ग आणि बोरिवली-विरार धीमा मार्ग या तिन्ही मार्गावर प्रत्येकी २ फेऱ्या वाढवण्यात येतील. यामुळे पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून एकूण २०२ फेऱ्या धावणार आहे, अशी माहिती रविवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागातून देण्यात आली.


हेही वाचा -

Lockdown In Maharashtra: ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

डर के आगे अंडरटेकर था ..!


पुढील बातमी
इतर बातम्या