‘या’ विशेष उपक्रमांनाही लाॅकडाऊनमधून सूट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाविरोधातील लढ्यात देशव्यापी लॉकडाऊनसंदर्भात (lockdown) गृह मंत्रालयाने (home ministery) सर्व मंत्रालये / विभागांना एकत्रित सुधारित मार्गदर्शक (new guideline for lockdown) सूचनांअंतर्गत काही विशिष्ट उपक्रमांना सूट देण्याचा आदेश जारी केला आहे. 

आदेशात लॉकडाऊन निर्बंधांमधून सूट दिलेले काही विशिष्ट उपक्रम पुढीलप्रमाणे :

  • अनुसूचित जमाती आणि वनक्षेत्रात राहणाऱ्या अन्य लोकांद्वारे दुय्यम वन उत्पादने (एमएफपी) / लाकडांव्यतिरिक्त इतर वन उत्पादने (एनटीएफपी) गोळा करणे, कापणी आणि प्रक्रिया करणे.
  • बांबू, नारळ, सुपारी, कोको, मसाल्यांची लागवड आणि त्यांची कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि विपणन.
  •  गृहनिर्माण वित्त कंपन्या (एचएफसी) आणि सूक्ष्म वित्त कंपन्यासह (एनबीएफसी - एमएफआय) बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) किमान कर्मचाऱ्यांसह
  •  सहकारी पतसंस्था
  • ग्रामीण भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता, विद्युत पारेषण लाइन टाकणे / उभारणे आणि दूरसंचार ऑप्टिकल फायबर तसेच केबल टाकणे आणि संबंधित अन्य कामांसह बांधकाम उपक्रम

हेही वाचा - Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

या आधीही सरकारने शेतीशी आणि वनांशी संबंधित काही व्यवसायांना परवानगी दिली होती. त्यामध्ये पुढील उद्योगांचा समावेश आहे.

  • खरेदी करणाऱ्या संस्था
  • कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेली मंडी. तथापि जागेवरच्या खरेदीस प्रोत्साहन दिले जावे
  • शेतकऱ्यांकडून आणि शेतमजुरांकडून करण्यात येणारी शेतीची कामे
  • मासेमारी, मत्स्य उद्योगासाठी लागणारे खाद्य आणि व्यवस्था, शित साखळी, विक्री व पणन, मत्स्यपालन, व्यावसायिक मत्स्यकेंद्र, खाद्य केंद्र, मासे, कोळंबी वाहतूक आणि अन्न उत्पादने, मत्स्य बीज आणि खाद्य, यासाठी काम करणारे कामगार
  • पेसा म्हणजेच पंचायत (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारीत) कायदा, १९९६,  नॉन पेसा वन हक्क कायदा क्षेत्रातील किरकोळ वन उत्पादने( साठा, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री), वने व बिगर वने क्षेत्रातील तेंदू पत्ता वेचणी, साठा आणि गोदामापर्यंतची वाहतूक
  • जंगलात वणवे टाळण्यासाठी पडलेली लाकडे वेचणे, तात्पुरत्या विक्रीसाठीचे डेपो इ. यामध्ये समावेश आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या