Advertisement

Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

मुख्यमंत्री सहायता निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा
SHARES

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी राज्यातील सरकारी यंत्रणा अनेक प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या सुरक्षेच्या तसंच, महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहायता निधीत अनेक जण आर्थिक भर घालत आहेत. त्यामुळे निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. हे योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावं असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे.

या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत  १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील २ दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. याशिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 

खात्याची माहिती  

  • मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
  • बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
  • स्टेट बँक ऑफ इंडिया,
  • मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
  • शाखा कोड 00300
  • आयएफएससी कोड SBIN0000300
  • सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.



हेही वाचा -

Coronavirus Update: दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली 156 परदेशी नागरिक मरकजच्या कार्यक्रमात सामील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा