टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली 156 परदेशी नागरिक मरकजच्या कार्यक्रमात सामील


टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली 156 परदेशी नागरिक मरकजच्या कार्यक्रमात सामील
SHARES
देशात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असताना, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हजारांवर गेला आहे. माञ हा आकडा वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या मरकज येथील कार्यक्रमात परदेशातून टूरिस्ट व्हिजावर आलेले 156 परदेशी नागरिक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. या सर्वांवर विविध जिल्ह्यात 15 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनलेल्या दिल्लीतील ‘तब्लीगी जमात’च्या धार्मिक संमेलनात सहभाग घेऊन परतलेल्या राज्यातील 1062 पैकी 890 जणांची ओळख पटवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या संमेलनाला देशाच्या सर्वच राज्यांमधील व्यक्तींची उपस्थिती होती. केंद्रीय यंत्रणांनी त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचा 'डंप डाटा' मिळवला आहे. जे या संमेलनात ज्या ज्या राज्यातून सहभागी झाले होते. त्या त्या राज्यानुसार  केंद्रीय यंञणेने त्या राज्याला माहिती पुरवली. त्यात महाराष्ट्रातून 1062 जण या संमेलनाला गेली होती. ही माहिती गोळा करताना 156 जणांनी त्या वेळी टूरिस्ट व्हिजावर भारतात सहभागी होतं, मरकज येथील कार्यक्रमात आपली उपस्थिती लावल्याचे आता उघडकीस आले आहे.

 
  या 156 विदेशी नागरिकांच्या विरोधात  Foreigner’s Act section 14 B व भा.दं.वि.कलम 188,269,270 नुसार गुन्हा नोंदविला आहे. मुंबई ,ठाणे , नवीमुंबई, अमरावती, नांदेड, नागपुर, पुणे अहमदनगर,चंद्रपुर व गडचिरोली मध्ये हे एकूण 15 गुन्हे नोंदविले आहेत . या परदेशी नागरिकांमध्ये कज़ाखस्तान -9, दक्षिण अफ़्रीका -1, बांगलादेश-13, ब्रूने-4, आयवोरियन्स-9, इराण-1, टोगो-6, म्यांनमार-18, मलेशिया-8, इंडोनेशिया-37, बेनिन-1, फ़िलीपींस-10, अमेरिका-1, टांज़ानिया-11, रशिया-2, जिबोती-5, घाना-1, किर्गिस्तान-19 या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांची रवानगी आता विलगीकरण कक्षात केलेली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा