मुंबईत २८४८ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा कोरोनाने मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एकीकडे राज्यामध्ये लॉक डाऊनच्या बाबतीत बरीच शिथिलता देण्यात आली आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्या अजूनही कमी झालेली नाही. मुंबईत (Mumbai) आज कोरोनाच्या २८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तर दिवसभरात ४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर दिवसभरात आज २२५७ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.  असे असले तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणयात आलेली नसल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.

हेही वाचाः-शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश!

मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या २,१९,९३८ वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये २२५७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण १,८३,७४२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या २४,७८३ साकीर्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण ९२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३९ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३३ रुग्ण पुरुष व १३ रुग्ण महिला होत्या. १ व्यक्तीचे वय ४० वर्षा खाली होते. २९ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित १६ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

हेही वाचाः- मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८३ टक्के आहे. ३० सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०४ टक्के होता. ०६ ऑक्टोबर २०२० पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या १२,०४,०८१ झाल्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ६७ दिवस आहे. मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या ६५१ आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती १०,०९७ आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहिल राबवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज १४,५७८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन १६,७१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ११,९६,४४१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २,४४,५२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८०.८१% झाले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या