राज्यात ५९०२ नवे रुग्ण, १५६ जणांचा दिवसभरात मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत बुधवारी कमालीची घट झाली. राज्यात आज दिवसभरात तब्बल ५ हजार ९०२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात १५६ जणांचा मृत्यू झाली. महाराष्ट्र अनलॉक ५ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

हेही वाचाः-अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण?

राज्यात अनलॉक ५ ला सुरवात झाली असताना, दिवसभरात कोरोनाचे ५९०२ नवे रुग्ण सापल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर दिवसभरात १५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच वेळी नोंदवल्या गेलेल्या एवढ्या कमी संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता १६,६६,६६८ इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या २५,३३,६८७ जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४३,७१० जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत (१६,६६,६६८) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या १,२७, ६०३ रुग्णांचाही समावेश आहे.

हेही वाचाः-'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

दरम्यान, कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या