मुंबईतील 'या' परिसरात सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढ झाली. या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महापालिका अनेक प्रयत्न करत आहे. तसंच, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रतिबंधित इमारतींबाबत नवीन नियम लागू केले.

मुंबईत सध्या प्रतिबंधित असलेल्या १० हजारांहून अधिक इमारतींपैकी सुमारे ५ हजार इमारती पश्चिम उपनगरांतील असून त्यातही सर्वाधिक १३०० इमारती केवळ बोरिवली (Boriwali) परिसरात आहेत. बोरिवलीत आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळले, त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे इमारतीतील आहेत. तसेच यापैकी बरेचसे रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

एखाद्या इमारतीत १० पेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले.

एकीकडे राज्यामध्ये लॉक डाऊनच्या बाबतीत बरीच शिथिलता देण्यात आली आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्या अजूनही कमी झालेली नाही. मुंबईत बुधवारी कोरोनाच्या २८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तर दिवसभरात ४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर दिवसभरात आज २२५७ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.  असे असले तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणयात आलेली नसल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.


हेही वाचा -

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या