Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने शुक्रवार ९ आॅक्टोबरपासून ५ विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वे सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस
SHARES

केंद्र सरकारच्या पाठोपाठ मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्र सरकारने देखील राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने शुक्रवार ९ आॅक्टोबरपासून ५ विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वे सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (five pairs of daily special express trains to be run on central railway route in maharashtra)

सध्या काही मोजक्या शहरांतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच विशेष ट्रेन्स चालवण्यात येत आहेत. अनलाॅकच्या प्रक्रिये अंतर्गत सर्व व्यवहार, सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होत असताना वाहतुकीचं महत्त्वाचं साधन असणारी रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं होतं. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मध्य रेल्वेने ५ शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेक्कन क्वीन, इंद्रायणी, नागपूर दुरांतो, विदर्भ आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस अशा या ५ रेल्वे गाड्या असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि नागपूर, गोंदिया आणि सोलापूर इथून ९ आॅक्टोबरपासून दररोज ५ विशेष रेल्वे गाड्यांच्या जोड्या धावतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

दसरा-दिवाळी असे येऊ घातलेले सण बघता प्रवाशांच्या सोईसाठी आणि महसूलाच्या दृष्टीकोनातूनआणखी काही महत्त्वाच्या ट्रेन सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव देखील रेल्वे प्रशासनासमोर ठेवण्यात आला आहे. या ट्रेन कधी सुरू होतील, याची प्रवाशांना नक्कीच प्रतिक्षाअसेल.

हेही वाचा -

१५ आॅक्टोबरपासून राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू?

 सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा