Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल


सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र सामान्य प्रवाशांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. मात्र लोकल सुरू करा अशी मागणी अनेकजण करत आहेत. अशातच मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ठाकरे सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने मुंबईत लोकल सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र लोकल सामान्यांसाठी सुरु नसल्याने सामान्य माणसांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्याच्या घडीला सामान्य प्रवाशांना ऑफिस गाठायाचं असेल तर २ ते ३ तास प्रवासाचे हाल सहन करावे लागत आहे.

ऑक्टोबरच्या मध्यात मुंबई लोकल सामान्यांसाठीही सुरु केली जाईल असं ठाकरे सरकारकडून सांगण्यात आलं. दरम्यान केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना याबाबत विचारलं गेलं असता ठाकरे सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतली लोकल सामान्यांसाठी कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुंबई लोकल सुरु होण्याबाबतचा संभ्रम कायम आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा