Advertisement

१५ आॅक्टोबरपासून राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू?

लवकरच राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्याची सर्वसामान्य प्रवाशांना परवानगी मिळू शकते. रेल्वे प्रशासन यावर विचार करत असून आॅक्टाेबर मध्यापर्यंत ही सेवा सुरू होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

१५ आॅक्टोबरपासून राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू?
SHARES

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत मुंबईतील लाेकल ट्रेनमधून प्रवास करण्याची सर्वसामान्यांना मुभा नसली, तरी लवकरच राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्याची सर्वसामान्य प्रवाशांना परवानगी मिळू शकते. रेल्वे प्रशासन यावर विचार करत असून आॅक्टाेबर मध्यापर्यंत ही सेवा सुरू होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.  

अनलाॅकच्या चौथ्या टप्प्या बऱ्याच सेवा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असून ३० सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाला एक प्रस्ताव पाठवण्यात आला असून या प्रस्तावानुसार प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने महत्त्वाच्या १९ ट्रेन सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. दसरा-दिवाळी दरम्यान या ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा तर होईलच, पण त्याचसोबत रेल्वेला देखील महसूल मिळू शकेल, असं प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय दसरा-दिवाळीनिमित्त १० विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं देखील सुचवण्यात आलं आहे.

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल

या प्रस्तावात सिद्धेश्वर एक्स्प्रेस, हुतात्मा एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्विन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, शिर्डी, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, पुणे-नांदेड विशेष एक्स्प्रेस, पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

रेल्वे प्रशासनाकडून या रेल्वे गाड्या सुरू करण्याची परवानगी मिळाली, तर १५ आॅक्टोबरपासून या गाड्या सुरू होऊ शकतील. तर या गाड्यांच्या तिकीटांसाठी १० आॅक्टोबरपासून बुकींग सुरू होतील, अशी शक्यता आहे. 

दिवाळी, छट पूजा यांसारखे सण लक्षात घेता पंजाब मेल, गोरखपूर, हावडा, लखनऊ, मडगाव इ. ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठीसुद्धा विशेष ट्रेन चालवण्यात येऊ शकते, अशी शक्यता आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा