Advertisement

कोरोनामुळं रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा पुरवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे.

कोरोनामुळं रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळं मुंबईतील पश्चिम (western railway) आणि मध्य रेल्वेच्या (Central Railway) १९२ कार्यरत कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व कुटुंबांतील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा पुरवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. मृतांमध्ये मध्य रेल्वेच्या सर्वाधिक म्हणजे १२९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कोरोनामुक्त झालेल्याने प्लाझ्मादान केल्यावर दुसऱ्या रुग्णाला जीवनदान मिळते; परंतु प्लाझ्मादान करण्यात रेल्वे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मागेच आहेत. कोरोनाची लागण झालेले पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व कुटुंब सदस्य मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आतापर्यंत रेल्वेचे २ हजार ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८५ टक्के पेक्षा जास्त आहे. परंतु कोरोनामुळे पश्चिम रेल्वेच्या ६३ जणांचा मृत्यू झाला असून १२९ जण हे मध्य रेल्वेवरील आहेत. १८ सप्टेंबपर्यंत रेल्वेच्या एकू ण १७७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या २० दिवसांत १५ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

कोरोनामुक्त रुग्णाने प्लाझ्मादान केल्यास त्याचा वापर गंभीर रुग्णांसाठी केला जातो. त्यामुळे रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होते. यात बरे झालेल्या रुग्णाचा रक्तगट जुळणे महत्त्वाचे असते. आतापर्यंत रेल्वेतील ८७ जणांनी रक्तद्रवदान केले असून त्याचा वापर ६१ रुग्णांसाठी करण्यात आला आहे. रेल्वेतील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पाहता प्लाझ्मादान करणाऱ्यांची संख्या कमीच आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा