स्तनपानासाठी अमृत केंद्र सुरु करा - शिवसेना

 प्रसुतीनंतर बहुतांशी महिलांना बालकाला स्तनपानाद्वारे दूध देता येत नाही. अशा बालकांना अाईचं दूध मिळणं अत्यावश्यक असतं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसंच दवाखान्यांमध्ये महिला दात्यांकडून दूध संकलन करण्यासाठी अमृत केंद्र सेवा सुरु करण्याची मागणी आता नगरसेवकांकडून होत आहे.

आईचं दूध अमृत समान 

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत, दवाखान्यात आणि आरोग्य केंद्रांमध्ये अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देत या सेवेला अमृत केंद्र नावानं ओळखलं जावं, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केली आहे. नवजात बालकांसाठी आईचं दूध अमृत समान समजलं जातं. अनेक बालकांना जन्मानंतर अाईकडून स्तनपानाद्वारे दूध मिळत नाही. त्या बालकांना इतर महिला दात्यांकडून दूध गोळा करून त्यावर प्रक्रिया करून उपलब्ध करून दिले जावे, असं सुजाता पाटेकर यांनी म्हटलं अाहे. 


हेही वाचा - 

अंधेरी, बदलापूर स्थानकातील पादचारी पूल धोकादायक

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?


पुढील बातमी
इतर बातम्या