घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात आली आहे. घट झालेल्या किंमती मध्यरात्री १२.०० वाजल्यानंतर लागू होतील. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही माहिती देण्यात आली आहे. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी लोकांच्या चिंतेत भर टाकली होती.

गेल्या २ महिन्यांत पेट्रोल - डिझेलच्या किंमतींत जवळपास ८ रुपयांनी वाढ झाली आहे. तर एलपीजी गॅसमध्ये तब्बल १२५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांत ६ वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती.

१ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. अर्थात केवळ दोन महिन्यांत प्रती सिलिंडर दरात १२५ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.


हेही वाचा -

  1. एफआयआर कुठंय? परमबीर सिंह यांना हायकोर्टाने फटकारलं
  1. कोरोना रुग्णासाठी बेड पाहिजे?, 'या' नंबरवर त्वरीत संपर्क साधा

पुढील बातमी
इतर बातम्या