तळीरामांना भलतीच चिंता, लॉकडाऊनमध्येही गुगलवर शोधतात दारू बनवायची टेकनिक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ केली. पण यात जास्त पंचाईत झाली ती तळीरामांची. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्यामुळे दारुची दुकानं देखील बंद आहेत. त्यामुळे तळीरामांची तहान भागवणं कठीण होऊन बसल्यामुळे दारु मिळवण्यासाठी अनेकांनी वेगवेळ्या युक्त्या शोधण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गुगलवर सध्या सर्वात जास्त घरात दारु कशी बनवावी? हे सर्च केलं जात आहे. गुगल ट्रेंडनुसार, लोकांनी २२ ते २८ मार्चदरम्यान गुगलवर घरात दारु कशी बनवता येईल, हे सर्वाधिक सर्च केलं. यासंदर्भात एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मते मार्चच्या शेवटी दारू दुप्पट किंमतीत विकली जात होती. जेव्हा अवैध विक्री थांबवण्यासाठी दारुच्या दुकानांना सील करण्यात आलं, तेव्हा दारुच्या किंमती आणखी वाढल्या.

तळीराम सध्या बंद असेलेली दारुची दुकानं फोडून दारू चोरत आहेत. तर कुठे नशेसाठी सॅनिटायझरचाही वापर केला जात असल्याचंही पुढे आले आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता तळीरामांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.


हेही वाचा

लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक

Coronavirus Updates: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मासेमारीला परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या