Advertisement

लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक

ऑनलाइन अॅप बेस टॅक्सी ओला-उबर यांनी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक
SHARES

ऑनलाइन अॅप बेस टॅक्सी ओला-उबर यांनी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिस आणि मुंबई महापालिका यांच्या मदतीनं अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहतुकीबाबात उबरनं वाहतूक पोलिसांशी, तर ओला कंपनीनं मुंबई महापालिकेशी करार केला आहे. ही वाहतुक सुरू झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ओला-उबरच्या अत्यावश्यक सेवेमुळं मुंबईकरांना घर ते रुग्णालय हा टप्पा विनाअडथळा सहज पार करणं शक्य होणार आहे. ओला आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार, मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी-अधिकारी आणि महापालिकेतील कर्मचारी यांना घर ते रुग्णालय अथवा घर ते कार्यालय या प्रवासासाठी आता खासगी टॅक्सी उपलब्ध होणार आहे. 

ओलाच्या अॅपवरून अत्यावश्यक सेवा म्हणून खासगी टॅक्सी बूक करून ही सुविधा महापालिकेतील कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. उबर आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्यात झालेल्या करारानुसार, मुंबईतील जनतेला रुग्णालयात जाण्यासाठी उबरच्या खासगी टॅक्सी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या खासगी टॅक्सींची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. या खासगी टॅक्सींसाठी अत्यावश्यक वाहतुकीचा पास देखील वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा